ठाणे महापालिकेने उपलब्ध केली 81 रूग्णवाहिकांची सुविधा

पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केली रूग्णवाहिकांची पाहणी
पालिकेने उपलब्ध केली 81 रूग्णवाहिकांची सुविधा


ठाणे


कोरोना कोव्हीडचे संकट वाढत असताना रूग्णालयांमध्ये, क्वारंटाईन सेंटर्स आणि आयोसोलेशन सेंटर्समध्ये नेण्यासाठी रूग्णांची गैरसोय होवू नये म्हणून महापालिकेने निर्माण केलेल्या रूग्णवाहिकांची आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून समाधान व्यकत केले. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते.
      सुरूवातीच्या काळात रूग्णवाहिकांमुळे नागरिकांची गैरसोय झाल्याच्या पार्श्वभूमीवर ना. शिंदे यांनी त्वरीत मोठ्या प्रमाणात रूग्णवाहिका भाड्याने घेण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर जवळपास 81 रूग्णवाहिका उपलब्ध करून घेतल्या आणि त्यांचे नियोजन करण्यासाठी 24 तास स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला.
      महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या या रूगणवाहिकांमध्ये महापालिकेच्या 3 कार्डियाक, 2 खासगी कार्डियाक रूग्णवाहिका आहेत. तसेस 14 परिवहन बस रूग्णवाहिका, 15 खासगी शाळा बस रूग्णवाहिका, रूग्णवाहिकेमध्ये रूपांतरित केलेली 20 वाहने आणि 11 खासगी रूग्णवाहिकांचा समावेश आहे. तथापि रूग्णवाहिकांची ही संख्या 100 पर्यंत वाढविण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केल्या.


 



Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image