पाणी पुरवठा विभागातील कामगारांना पगारही नाही आणि सुरक्षिततेची साधनेही नाहीत
ठाणे
ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कळवा प्रभागात कार्यरत सुमारे ६० वाल्वमैन / पंप ओपरेटर यांच्या प्रश्नांबाबत ईमेल वर पत्रादवारे उप नगर अभियंता, श्री विनोद पवार , उप अभियंता प्रशांत फिरके तसेच संबंधित ठेकेदार श्री अतुल विखनकर ( मे. विजया कंस्ट्रक्शन कंपनी) यांना कामगारानी व युनियन तर्फे वारंवार विनंती केली आहे. परंतु कामगारांना वेतन ही मिळाले नाही आणि सुरक्षिततेची साधने अद्यापही मिळाली नाहीत. पगार व सुविधा मागितले की, कामगारांना थातुरमातर उत्तर दिले जात आहे. तसेच कामावरून काढन टाकण्यात येईल अशी धमकी दिली जाते. याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी श्रमिक जनता संघाने पुन्हा एकदा केली आहे.
गेली दोन वर्षात कामगारांना कधी गणवेश, बोनस, पीएफ, ईएसआयसी या कायदेशीर सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. आताच्या कोरोना लोक डाऊन सारख्या महामारीच्या काळात ही मास्क, हैंडग्लोव्ज, सेनिटायझर ई. सुरक्षेची साधने न पुरवून प्रशासन त्यांचेवर अन्याय करत आहे।. सदरील कामगार हे वेगवेगळ्या ठिकाणी वस्त्यांमध्ये/ झोपडपट्टीत जाऊन पाणी पुरवठा साठी वाल्व ओपरेट करतात. अनेक ठिकाणी घनदाट वस्ती, छोट्या छोट्या गल्लीत जाऊन काम करावे लागते. या परिस्थितीत जर कोणत्याही कामगारांना कोरोना संसर्गाचा त्रास झाला तर संबंधित अधिकारी व ठेकेदाराला दोषी ठरविण्यात यावे, अशी मागणी या आधीही करण्यात आली होती. मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.