महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा



मुंबई


महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम ठेवणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहेत ही चिंतेची बाब असली तरी सरकार युद्ध पातळीवर काम करत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 33 हजार तर मुंबईत 19 हजार चाचण्या झाल्या आहेत. यातल्या 60 ते 70 टक्के लोकांमध्ये सौम्य ते अती सौम्य लक्षणे असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांची संख्या जास्त आहे . 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असेल. त्याबाबत 14 तारखेला नियम काय असतील ते सांगणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


देशात कोरोना रुग्णांना आकडा वाढतो आहे. देशात 586 कोव्हिड हॉस्पिटल्स तयार झाले असून 1 लाख आयसोलेशन बेड्सही तयार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनसारख्या उपाय योजना केल्या नसत्या तर देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा हा 2 लाखांच्यावर गेला असता असंही त्यांनी सांगितलं. देशात डॉक्टरांसाठी PPE किटची आणि औषधांची कमतरता नाही. त्याचं देशातही उत्पादन सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.


महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या झाल्या. यातील मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या..यामध्ये १००० जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. ६० ते ७० टक्के कोरोना पॉझिटीव्हपैकींची लक्षणे ही सौम्य आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. पण यामध्ये देखील वयोमान, प्रकृती पाहता हा धोका पोहोचतो आहे. हृदयविकार, रक्तदाब असे आजार असलेल्या व्यक्ती तसेच शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण यात येते. घराबाहेर पडू नका. घरातील वयस्कर नातेवाईकांना जपा. त्यांच्यापासून अंतर बाळगा असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.


परिस्थिती नियंत्रणात असली तर गाफील राहून चालणार नाही मला कोरोनाचे प्रमाण शुन्यावर आणायचे आहे. आपण घरोघरी जाऊन चाचणी करतोय. पुढे संक्रमित होणारी चाचणी आपण तोडतोय. ही तोडायला वेळ लागेल. १४ तारखेनंतरही मी लॉकडाऊन कायम ठेवणार असे मी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले. त्यानुसार हे लॉकाडाऊन किमान ३० एप्रिलपर्यत सुरु ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान प्रत्येक गोष्टीची माहिती मी वेळोवेळी देत जाईन असेही त्यांनी स्पष्ट केले.