ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील असुविधा दूर करण्याची विकास रेपाळे यांची मागणी 
ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील असुविधा दूर करण्याची विकास रेपाळे यांची मागणी 

 


ठाणे,

संबंध देशभर कोविड-19 (करोना व्हायरस) चे संकट घोंघावत असताना प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथे रुग्णांना व तेथील कर्मचाऱयांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. संसर्गातून सदर आजार पसरत असताना प्रादेशिक मनोरुग्णालय येथे योग्य त्या उपाययोजना न केल्यास सदर रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होण्याची दाट शक्यता आहे, तरी सदर मनोरुग्णालयात असलेल्या असुविधांकडे लक्ष देऊन त्या गांभीर्याने दूर कराव्यात अशी मागणी ठाणे मनपा शिक्षण समिती सभापती नगरसेवक विकास रेपाळे यांनी प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

सदर मनोरुग्णालयात असणाऱया रुग्णांना तसेच कर्मचाऱयांना कोणत्याही प्रकारचे मास्क अथवा हात धुण्याकरिता हॅण्डवॉश उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. सध्याच्या लॉकडाऊनमुळे दूरचे कर्मचारी येणे शक्य नसल्याने स्थानिक कर्मचाऱयांवर ताण येत आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात नवीन रुग्णांना कोणतीही चाचणी न करता दाखल करण्यात येते जे अतिशय धोकादायक आहे. या रुग्णालयातील रुग्णांना इतर तपासणीकरिता रुग्णालयाबाहेर नेण्यात येते आणि ते धोकादायक आहे. अपुरी उपकरणे व नियोजनातील अभाव यामुळे महिला कर्मचाऱयांच्या देखील अनेक तक्रारी आहेत आदी असुविधा या ठिकाणी असून आणि यामुळे कोरोना व्हायरसचा प्रचार होण्याची दाट शक्यता असून त्यामुळे रुग्ण व कर्मचाऱयांमध्ये भितीचे वातावरण आहे.  

तरी कोरोना व्हायरसचा संकटावर मात करण्याकरिता या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तातडीने त्यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी विनंती विकास रेपाळे यांनी केली आहे. 

 

 


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image