देशात ७१२ पैकी २७४ जिल्हे कोरोनाबाधित. फक्त तीन दिवसांत ६३ ने झाली वाढ

 देशात ७१२ पैकी २७४ जिल्हे कोरोनाबाधित. फक्त तीन दिवसांत ६३ ने झाली वाढ



नवी दिल्ली 


 देशात ७१२ जिल्ह्यांपैकी कोविड-१९ चे जिल्हे २११ वरून २७४ झाले ते फक्त तीन दिवसांत. हा फैलाव देशात ४० टक्के भागात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सचिवांच्या उच्चाधिकार समितीला लॉकडाऊनबाबत काय कृती करणार याचा अहवाल देण्यास सांगितले आहे. ११ एप्रिल रोजी या समितीची बैठक आहे. सरकारने अँटीबॉडी टेस्टस निवडलेल्या ४० हॉटस्पॉटसमध्ये बुधवारपासून घेण्यास परवानगी दिली आहे. यावरून लॉकडाऊन मागे घ्यावा की ठराविक ठिकाणेच निवडावी हे सरकार ठरवेल.


लॉकडाऊन १५ एप्रिलनंतर मागे घेण्याची मागणी राज्यांमागून राज्ये करत असले तरी केंद्र सरकार चिंतेत असून निर्बंध शिथील करण्याबाबत कमालीची काळजी घेत आहे. आरोग्य मंत्रालयाने २८ दिवसांसाठी हे हॉटस्पॉटस पूर्ण बंद करण्याची व मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी टेस्टस करण्याची सूचना केली आहे. पंतप्रधान मंत्रीगटाशी बुधवारी, आठ एप्रिल रोजी संसदीय पक्षांच्या नेत्यांशी तर मुख्यमंत्र्यांशी नऊ एप्रिलला व इतर सबंधितांशी रविवारी बैठका घेणार आहेत.


पंतप्रधान मोदींची नेत्यांशी चर्चा देशातील परिस्थितीवर  रविवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. नरेंद्र मोदी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि प्रतिभा पाटील व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच.डी. देवेगौडा यांच्याशीही बोलले.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image