मिरा-भांईदरमध्ये दोन गृहिणींना कोरोनाची लागण
मिरा भाईंदर
मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. भाईंदरच्या एस वी रोड परिसराती राहणारी 56 वर्षीय महिला व नारायण नगर येथे राहणाऱ्या 60 वर्षाच्या महिलेला करोनाची लागण झाली आहे. शनिवारी करण्यात आलेल्या तपासणी अहवालात या दोन्ही महिलांना करोनाची लागणं झाल्याचे स्पष्ट झाले आहे .विशेष म्हणजे या दोन्ही महिला गृहिणी असल्याचे समोर आले आहे.एका महिलेला सेफी रुग्णालयात गेली असल्यामुळे तर दुसऱ्या महिलेला परिवारातील नागरिकांकडून लागण झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्या कुटुंबियांना विलगीकरणात कक्षात ठेवण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत आहे. त्याच प्रकारे रुग्णाच्या घरातील नागरिकांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. सध्या हे दोन्ही रुग्ण कुणाच्या संपर्कात आले याचा तपास सुरु असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे. त्याच प्रकारे मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात शनिवारी दोन नवीन रुग्ण आढळले असून एकूण संख्या आता 8 एवढी झाली आहे. यातील समोर आलेले दोन्ही रुग्ण घरगुती महिला असून यांचा कुठलाही प्रवास इतिहास नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.