कळवा मुंब्रा दिवा येथे वाहनांस प्रतिबंध 
कळवा मुंब्रा दिवा येथे वाहनांस प्रतिबंध 

 


ठाणे 

कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंब्रा प्रभाग समिती,  कळवा प्रभाग समिती व दिवा प्रभाग समिती ठाणे महानगरपालिका या प्रभाग क्षेत्रासाठी कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर गल्लोगल्ली याठिकाणी दुचाकी तीन चाकी वाहने रिक्षा हलकी चार चाकी वाहने तसेच सर्व प्रकारच्या टॅक्सी यांचा प्रवासी वापर करण्यास आज दिनांक 5 एप्रिल  सायंकाळी सहा वाजेपासून पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली 

हा  आदेश शासकीय-निमशासकीय वाहने व कर्मचारी कर्तव्यावर असताना वापरली जाणारी खाजगी वाहने पोलीस होमगार्ड आपत्ती व्यवस्थापनातील वाहने तसेच आर टी ओ ने परवानगी दिलेल्या अॉन कॉल रिक्षा तसेच अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणारी वाहने यांना लागु नसेल.

हा आदेश खाली यंत्रणांना लागू होणार नाही पोलीस होमगार्ड नागरी संरक्षण दल प्रसार माध्यम व त्यांचे कर्तव्यावर असणारे प्रतिनिधी अत्यावश्यक सेवा व त्यासाठी आवश्यक असणारी सर्व वाहने जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतूक वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या सर्व आस्थापनांची वाहने तसेच वेळोवेळीच्या ज्या आस्थापनांना सवलत देण्यात आलेली आहे त्यांची वाहने यातून वगळण्यात आली आहे सवलत दिलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी तसेच खाजगी आस्थापना यांनी स्वतःसोबत ओळखपत्र तसेच आवश्यक कागदपत्र बाळगणे बंधनकारक राहील.  उक्त आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येत असून सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.






 






Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image