ठाणे नगर पोलिसांना सॅनिटायझर आणि फेसशील्ड चे वाटप


ठाणे नगर पोलिसांना सॅनिटायझर आणि फेसशील्ड चे वाटप


ठाणे


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्व न करता रस्त्यावर आहोरात्र लढणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने  भाजपच्या वतीने पोलिसांना सॅनिटायझर आणि फेसशिल्ड वाटप करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा, पोलीस, अत्यवश्यक सेवा सज्ज आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातला लॉकडाऊन हा ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामूळे पोलिसांवरील ताण अधिक वाढला आहे. लॉकडाऊनच्या या काळात पोलिसांच्या जीवाला कोरोनामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामूळे त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


ठाण्यात देखील कोरोना संसर्ग वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन ठाण्यातील भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश मधुकर कोळी आणि भाजपा कार्यकर्ते बाळाराम खोपकर यांच्या वतीने ठाणे नगर पोलिस स्थानकच्या पोलिसांना सॅनिटायझर आणि फेसशिल्ड देण्यात आल्या आहे.ठाणे नगर पोलीस स्थानकातील पोलिसाला कोरोना ची लागण झाली होती त्यामुळे स्थानकात खूप चिंतेचे वातावरण होते.बहुतेक पोलीस कर्मचारी क्वारंटाईन झाले होते .हि बाब लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी ह्यांचा ताब्यात सॅनिटायझर आणि फेसशिल्ड देण्यात आल्याचे निलेश कोळी यांनी सांगितले. त्यावेळी निलेश डोके, संतोष साळुंखे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.