समाजसेवक सुनील काबरा यांच्या वतीने गरीब-गरजूंना जेवण वाटप
ठाणे
कोरोना विषाणूचा संसर्ग रोकण्यासाठी ठाणे शहरात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेला असताना हातावर पोट आलेल्या गरीब -गरजू नागरिकांचे अन्नावाचून हाल होऊ नये यासाठी भाजपा नेते,समाजसेवक सुनील काबरा यांच्या वतीने जेवण वाटप करण्यात येत आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे.यामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याने हातावर पोट आलेल्या गरजू व गरीब नागरिकांचे जेवणावाचून हाल होऊ नये यासाठी या नागरिकांच्या मदतीला भाजपाचे नेते,समाजसेवक सुनील काबरा धावून आले आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून घोडबंदर रोड परिसरातील गरजू-गरीब नागरिक, कामगार,मजूर यांना जेवण देण्याची सेवा काबरा यांच्या वतीने करण्यात येत आहे.आमदार व भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील काबरा यांच्या वतीने रोज सुमारे 800 पॅकेट जेवण वाटप करण्यात येत आहे.पुढे अजून लॉकडाऊन वाढल्यास रोज 1000 ते 1200 पॅकेट जेवण वाढण्याचा संकल्प आपण केला असून या कधी आपल्या विभागातील नागरिकांना 15 हजार नागरिकांना मास्क वाटप केल्याचे श्री काबरा यांनी यावेळी सांगितले.
यामध्ये विलास साठे, श्री कैलास म्हात्रे,परिवहन समिती सदस्य विकास पाटील,बप्पी दास,स्वप्नाली साळवी,वीणा लाड, विनय सिह ,राजेश सावंत ,राजू सिह,विष्णू लोहार,ऋषिकेश मोरे, अॅड हेमंत म्हात्रे,शांताराम चौधरी, श्री मनोज ,विजय कदम, अमित शुहानी,सोनू हेगडे,रवि साने ,शैलेंद्र चिखलकर सौ सुनिता पवार ,चंदन अंगद विश्वकर्मा आदी सह भाजप कार्यकर्ते ,पदाधिकारी यांचे या सेवाकार्यत सहभाग लाभला