निराधार जेष्ठ नागरिकांना शिवसेनेने दिला मदतीचा हात

निराधार जेष्ठ नागरिकांना शिवसेनेने दिला मदतीचा हात



 ठाणे


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन केला आहे. तसेच कोरोना संसर्गामुळे जेष्ठ नागरिकांच्या जीविताला अधिक भीती असल्याने जेष्ठ नागरिकांनी घरा बाहेर पडून नये व स्वतःची काळजी घ्यावी असे सांगत "तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी" घेतो आव्हान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले होते.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिक्षण मंडळ सभापती, शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव यांनी प्रभाग क्र -१९ या आपल्या  प्रभागातील जेष्ठ नागरिकांची जबाबदारी स्वीकारली आहे. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊनमुळे घरत अडकून पडलेल्या निराधार जेष्ठ नागरिकांना शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे.


एरवी घर काम करणाऱ्यांवर अवलंबून असेल्या जेष्ठ नागरिकांना कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःची कामे स्वतः करावी लागत होते यामध्ये जेवण बनवणे,औषधे आणणे,डॉक्टर उपचारसाठी जेणे आदी कामे जेष्ठ नागरिकांना करावे लागत होती .त्यांची हि अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव यांनी स्वतः या  जेष्ठ नागरिकांना दोन वेळचे जेवण,औषधे घरपोच आणून देणे व डॉक्टरांकडे उपचारसाठी घेऊन जाण्याची जबाबदारी घेतली असून त्याप्रमाणे त्यांना सेवा देत आहेत.आतापर्यंत ५६ जेष्ठ नागरिकांपर्यंत सदरची सेवा पोहचवण्यात आली आहे. जेष्ठ नागरिकांनी घाबरू जाऊ नये शिवसेना आपल्या बरोबर आहे .आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास प्रभागातील जेष्ठ नागरिकांनी आम्हाला विकास रेपाळे - ९८२१२४२८३६,सौ नम्रता भोसले-जाधव- ९९६७६०२२२२ या नंबरवर संपर्क करावा असे आव्हान  नगरसेवक विकास रेपाळे यांनी केले आहे