पोलिसांच्या आरोग्य रक्षणासाठी धनगर प्रतिष्ठानही पुढे सरसावली

पोलिसांच्या आरोग्य रक्षणासाठी धनगर प्रतिष्ठानही पुढे सरसावली



ठाणे


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या जीवाची पर्व न करता रस्त्यावर आहोरात्र लढणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने पोलिसांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे. ठाण्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याची बाबा लक्षात घेऊन ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान हि संघटना पोलिसांचा मदतीला सरसावली असून संघटनेच्या वतीने ठाणे शहर पोलिसांना व ठाणे ग्रामीण पोलिसांना प्रत्येकी १०० पीपीई किट देण्यात आल्या आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजीराव राठोड यांच्या कडे या पीपीई किट संघटनेचे कार्याध्यक्ष महेश गुंड व   अनिल जरग यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. या पीपीई किटसाठी धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते उद्योजक संदेश कवितके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
 राज्यात कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा, पोलीस, अत्यवश्यक सेवा सज्ज आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातला लॉकडाऊन हा ३ मे पर्यंत वाढण्यात आला आहे. त्यामूळे पोलिसांवरील ताण अधिक वाढला आहे. लॉकडाऊनच्या  या काळात पोलिसांच्या जीवाला कोरोनामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामूळे त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 ठाणे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन १६-१६ तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही हे आपले देखील कर्तव्य आहे. या भावनेने धनगर प्रतिष्ठानच्या वतीने या पीपीई किटचे वाटप करण्यात आल


 

 

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image