त्या मारहाणीची चौकशी करण्याची मागणी

त्या मारहाणीची चौकशी करण्याची मागणी



ठाणे :


दिवे, मोबाईल टॉर्च प्रज्वलित करण्याच्या आवाहनावर घोडबंदर रोड येथील रहिवासी अनंत करमुसे यांनी कमेंट केली होती. त्यावरुन गणवेशातील दोघा पोलिसांसह चौघा जणांनी करमुसे यांना १५ ते २० जणांनी मारहाण केली. पोलिसांच्याच फायबर काठीने मारहाण झाली असल्याचा करमुसे यांचा आरोप आहे. फेसबूक कमेंटमुळे झालेली मारहाण हा गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची गरज आहे. फिर्यादीला  पोलिसांसमोरच १५ ते २० जणांनी मारहाण केली. त्यानंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यात फिर्यादीला आणण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार केळकर आणि डावखरे यांनी फणसळकर यांच्याकडे केली आहे.


Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image