नागरिकांना घरपोच भाजी अवघ्या १०० रुपयात, शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम




नागरिकांना घरपोच भाजी अवघ्या १०० रुपयात, शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

 


 

ठाणे

:ठाणे महापालिका प्रभाग क्र १९ शिवसेनेच्या वतीने अवघ्या १०० रुपयात शेतकऱ्यांची ताजी भाजी थेट सोसायटीच्या दारात देण्यात येत असल्याने नागरिकांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला आहे.

 

तुम्ही खबरदारी घ्या,आम्ही जबाबदारी घेतो... या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठामपा शिक्षण समिती सभापती,स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या वतीने प्रभागातील सोसायट्यांना अवघ्या १०० रुपयात शेतकऱ्यांची ताजी भाजी थेट सोसायटीच्या दारात देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून सोसायटीमधील नागरिकांनी देखील याला उदंड असा प्रतिसाद दिला आहे.फक्त १०० रुपयात २किलो कांदे,१ किलो टोमॅटो,१ किलो काकडी ,१किलो बटाटा,१किलो कोबी,अर्धा किलो शिमला मिरची, अर्धा किलो हिरवी मिरची अशी भाजी नागरिकांना  मिळत असल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

 

ठामपा शिक्षण समिती सभापती,नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी रविवारी एलबीएस मार्गवरील काशिश पार्क येथून या उपक्रमाला सुरुवात केली असून अवघ्या १०० रुपयात 8 दिवस पुरेल इतकी भाजी मिळत असल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केला आहे.गर्दी होऊन कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी शेतकऱ्याची ही भाजी सोसायटीच्या दारात देण्यात येत असून सोसायटीच्या वतीने नागरिकांच्या घरी ही भाजी पोहचण्यात येत आहे यामुळे आता भाजी घेण्यासाठी नागरीकांना गर्दी करावी लागणार नाही आणि या कोरोना संकटामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला देखील मदतीचा हात मिळेल या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून संपूर्ण प्रभागात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितले. प्रभागातील सोसायट्यांनी जर मागणी केली तर त्यांच्या मागणीप्रमाणे भाजी पुरवण्यात येईल असे माजी नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी सांगितले.


 

 



 


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image