ओवळा - माजिवडा विधानसभा मतदारसंघ व मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेकडून ' शाखा तेथे भोजन '

ओवळा - माजिवडा विधानसभा मतदारसंघ व मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेकडून ' शाखा तेथे भोजन '

* शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा गरजुंसाठी उपक्रम
* ३० हजार नागरिकांना दररोज भोजन देणार
* १५ एप्रिल पासून 'शाखा तेथे भोजन'ला सुरुवात  




ठाणे



'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात , राज्यात 'लॉकडाऊन' सुरु असला तरी त्यामुळे हातावर पोट असलेले  कष्टकरी , गरीब आणि श्रमिक वर्गाचे खूप हाल सध्या होत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या ओवळा - माजिवडा विधानसभा मतदारसंघात कुणीही उपाशी झोपू नये किंवा कुणाचेही पोट अन्नाशिवाय खाली राहू नये यासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे पहिल्या दिवसापासून प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाचा एक पुढील भाग म्हणून आता आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून 'शिवसेना शाखा तिथे भोजन' ही संकल्पना ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रात १५ एप्रिल पासून राबवली जाणार आहे. ३० एप्रिल पर्यंत ही संकल्पना राबवली जाणार आहे. ओवळा - माजिवडा विधानसभा मतदारसंघ  आणि मीरा भाईंदर शहरात किमान ३० हजार लोकांना दुपारचे जेवण देण्याची तयारी केली आहे , असे सरनाईक यांनी पत्रकारांना सांगितले.

'कोरोना'चा वाढता धोका लक्षात घेऊन 'लॉकडाऊन' महाराष्ट्र राज्यात ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. आधीचे २० दिवस लोकांनी कशीबशी गुजराण केली. मात्र आता अनेक गरीब - गरजू आणि कष्टकरीचें दिवस व्यतीत करताना हाल सुरु झाले आहेत. जे रोजंदारीवर काम करतात अशांच्या हाताला काम नाही आणि श्रमिक वर्गात काम करणारे सगळेच घरी बसल्याने अनेक कष्टकरी लोकांना आपला उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न पडला आहे. अनेकांकडे रेशनिंग कार्ड नाही किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने गरजू असूनही रेशनिंग वरील धान्य अनेकांना मिळालेले नाही. त्यामुळे असंख्य कुटुंबाचे हाल होत आहेत. समाजातील हि परिस्थिती जाणून प्रताप सरनाईक यांनी आपले उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.  ओवळा माजिवडा व मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात 'शाखा तेथे भोजन'  हा उपक्रम राबवला जाणार आहे.   



ओवळा माजिवडा व मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रात कुणीही उपाशी राहू नये असा प्रयत्न आमदार प्रताप सरनाईक हे गेले काही दिवस करीत आहेत. त्यातून गरजूना दुपारचे जेवण मिळावे म्हणून 'शाखा तिथे भोजन' हि संकल्पना सरनाईक यांनी मांडली असून त्याची प्रत्यक्ष सुरुवात १५ एप्रिल रोजी केली जाणार आहे. दुपारी १२ ते २ यावेळेत ओवळा माजिवडा व मीरा भाईंदर शहरातील शिवसेनेच्या सर्व शाखांवर गरजूना भोजन दिले जाणार आहे. या भागातील गरीब गरजूंनि आपल्या नावांची नोंदणी जवळच्या शिवसेना पदाधिकारी , नगरसेवक किंवा कार्यकर्त्यांकडे केल्यास दररोज किती लोकांना भोजन त्या - त्या शाखांवर लागेल याची पूर्णपणे व्यवस्था करता येणार आहे.  त्यामुळे गरीब - गरजू नागरिकांनी आपले नाव जवळच्या शिवसेना पदाधिकाऱ्याकडे नोंदवावे , असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.  शहरात दररोज ३० हजार लोकांना भोजन देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

१५ ते ३० एप्रिल पर्यंत 'शाखा तेथे भोजन'  हा उपक्रम राबवला जाणार असून शिवसेनेच्या शाखा जिथे जिथे आहेत तसेच नगरसेवकांची कार्यालये येथे गरीब - गरजूना हे भोजन दिले जाणार आहे. अनेक गरजू कुटुंबाकडे रेशनिंग कार्ड नाही. काहींना पुरेसे कागदपत्र नसल्याने रेशनिंग वर धान्य मिळत नाही अशा अनेक गरजू नागरिकांसाठी प्रामुख्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे सरनाईक म्हणाले. 


'कोरोना'मुळे देशात आणि आपल्या राज्यात अचानक उद्भवलेले हे मोठे संकट आहे. त्यामुळे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघात आणि मीरा भाईंदर शहरात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी जे जे करावे लागेल ते करू. त्यासाठी एक रचनात्मक सेवा कार्यक्रम आखला असून  'शाखा तेथे भोजन' हा त्याचाच एक भाग आहे , असे सरनाईक यांनी पुढे बोलताना सांगितले.

३० हजार लोकांना भोजन
या उपक्रमाअंतर्गत रोज साधारण ३० हजार लोकांना जेवण द्यायचा संकल्प करण्यात आला आहे. आठवड्यात रोज भोजनाचा एकच प्रकार न ठेवता एक दिवस पुरी भाजी , एखाद दिवस मसाला भात , कधी पुलाव तर कधी खिचडी यावेळी नागरिकांना भोजनात दिली जाईल , असे सरनाईक यांनी सांगितले.