मागील ४८ तासात ठाणे शहरात एकाही नव्या कोरोना बाधीत रुग्णाची नोंद नाही

मागील ४८ तासात ठाणे शहरात एकाही नव्या कोरोना बाधीत रुग्णाची नोंद नाही



ठाणे :


ठाण्याही मागील काही दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत होती. मात्र आता ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. मागील ४८ तासात ठाणे शहरात एकाही नव्या कोरोना बाधीत रुग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे ठाणेकरांना हा काहीसा दिलासा असला तरी ठाणेकरांनी घरीच राहावे असे आवाहन केले आहे.


कोरोना व्हायरसचे सोमवारी दोन रु ग्ण ठाण्यात आढळले होते. हे दोन रु ग्ण वर्तकनगर भागात आढळले होते. त्यामुळे आता ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १२ झाली होती. नागरीकांनी संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यानंतर तब्बल दोन आठवडयांनी रुग्णांच्या संख्येत दिवसाला वाढ होतांना दिसून आली. कळव्यातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच भागातील आणखी दोघांना याची लागण झाली असल्याची माहिती समोर आली.


यामध्ये पती पत्नीचा समावेश आहे. तर आतापर्यंत शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही १२ वर गेली आहे. कोरोना आता तिसऱ्या स्टेजला आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर पडू नये आवाहन पालिकेने केले आहे. याच तिस या स्टेजला संसर्गातून हा व्हायरस मोठ्या प्रमाणात परसत असतो. त्यामुळेच लॉकडाऊनच्या काळात कारण नसताना कोणीही एक दुसऱ्यांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन वारंवार महापालिकेकडून करण्यात येत आहे. अशा वातावरणात मंगळवार आणि बुधवारी अशा दोन दिवसात एकाही नव्या कोरोना ग्रस्त रुग्णांची नोंद ठाण्यात झाली नसल्याची माहिती न झाल्याने शहरासाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.


Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image