रुग्णांकडून केसपेपरसाठी फी आकारली जावू नये -  महापौर नरेश म्हस्के यांचे निर्देश

रुग्णांकडून केसपेपरसाठी फी आकारली जावू नये -  महापौर नरेश म्हस्के यांचे निर्देश



ठाणे


कोरोनामुळे साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभागसमितीनिहाय खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी रुग्णांकडून १० रुपये इतकी केसपेपर फी आकारण्यात येत होती. रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत व गर्दी टाळावी यासाठी लॉकडाऊन असेपर्यत रुग्णांकडून केसपेपरसाठी १० रुपये फी आकारली जावू नये असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रान्वये महापालिका आयुक्तांना दिले, यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.


लॉकडाऊन परिस्थीतीत नागरिकांना साध्या आजारांवर देखील उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या विविध भागात आरोग्यकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. महापालिका आरोग्यकेंद्रातील सर्व डॉक्टर्स हे कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे खाजगी डॉक्टरांच्या मदतीने या आरोग्यकेंद्रात रुग्णांना सेवा दिली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून ते देखील रु ग्णांमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळले जावे यासाठी आरोग्यकेंद्रात मदत करीत आहेत. या आरोगयकेंद्रात येणाऱ्या रुग्णांकडून १० रु पये केसपेपरची फी आकारण्यात येत असल्यामुळे काही व्यक्ती हेतुपुरस्सर याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सद्यस्थीतील रु ग्णांकडून केसपेपरची फी आकारण्यात येवू नये अशी मागणी म्हस्के यांनी आयुक्तांना पत्रान्वये आयुक्तांना केली होती. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी देखील तात्काळ ही मागणी मान्य करु न आरोगयकेंद्रांना सूचना देवून लॉकडाऊन असेपर्यंत केसपेपरची फी न आकारण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महापौरांनी आयुक्त यांच्यासह कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी काम करीत असलेल्या महापालिकेच्या सर्व अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस यांच्या कामाची दखल घेवून त्यांचे कौतुक केले आहे. सद्यस्थितीत सर्वजण कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वेच्छेने मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळावी, व सोशल डिस्टान्सींग पाळले जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे रुग्णांना निश्चीतच दिलासा मिळेल असे म्हस्के यांनी नमूद केले. तसेच या कामी पुढाकार घेवून सह का करणा या खाजगी डॉक्टर्स व सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्ते करीत असलेल्या कामाचे महापौरांनी कौतुक केले आहे.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image