राष्टवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे रुग्णालयात

राष्टवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे रुग्णालयात 



ठाणे :


ठाण्यातील राष्टवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पाच सुरक्षारक्षक, आचारी २ कार्यकर्ते अशा १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतांनाच आता त्यात राष्टवादीच्या या बड्या नेत्याचा यात समावेश झाला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आल्यानेच त्यांना त्याची लागण झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहे. सोमवारी शहरात ३० रुग्णांची भर पडल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी सात जणांची भर पडली असून शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा हा आता कल्याण डोंबिवलीहून अधिकचा झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५१ झाली झाली आहे. तर ११ जणांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. जिल्ह्यात मंगळवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक सात नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image