कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील पत्रकारांची चाचणी,
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने मानले डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार
ठाणे,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणाऱया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जाहीर आभार मानले आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. असे असले तरी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागते. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे शहरातील पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन अशा 38 जाणांची तातडीने चाचणी केली होती. या चाचणीचे आज सायंकाळी रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह Aआले आहेत. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या कमिटीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.