बिहारच्या त्या कामगारांना  मिळाली मदत
बिहारच्या त्या कामगारांना  मिळाली मदत

 बिहारच्या आमदाराने मदतीसाठी उद्धवजी ठाकरे यांना घातले होते साकडे




ठाणे


ठाण्यातील कोपरी भागात अडकलेल्या बिहार येथील कामगारांना युवा सेनेचे कोपरी पाचपाखाडी समन्वयक दीपक झाडे यांनी मदतीचा हात दिला आहे. लोकडाऊनमुळे ठाण्यातील कोपरी येथील पारशीवाडी येथे बिहार - पाटण येथील काही कामगार अडकले असून त्यांच्याकडे अन्नधान्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती हरिवंश चौधरी या कामगाराने आपल्या मूळगावी बिहार-पाटण येथील राजदचे आमदार सरोज यादव यांना कळवले त्यानुसार  यादव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना भ्रमणध्वनी करून मदतीचे आव्हान केले.


उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानंतर  पराशीवाडी येथील शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते कोपरी-पाचपाखाडी विधानसभा युवा सेना  समन्वयक दीपक  झाडे यांनी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली त्वरित आपले सहकारी लाला गुप्ता यांच्या मार्फत या कुटुंबियांना अन्नधान्य वाटप करून मदतीचा हात दिला असून कोणतीही मदत लागल्यास पुरवण्यात येईल असे आश्वासन दिले .यानंतर या बिहारच्या कुटुंबीयांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे व दीपक झाडे यांचे आभार मांडले आहे