मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना उद्या शेवटचा दिवस

मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना उद्या शेवटचा दिवस



ठाणे


ठाणे जिल्हयातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था कंपन्यांनी  मनुष्यबळाची माहिती राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी 30 एप्रिल 2020 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.सेवायोजना कार्यालये कायदा 1959 अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्याच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष/ स्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस कायद्यातील तरतूदीनुसार भरणे बंधनकारक आहे.


मार्च 2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केद्र जुने कोषागार कार्यालय आवार,ठाणे कार्यालयात चालू आहे.सर्व आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.सर्व आस्थापनांना यापुर्वीचे युजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत .त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या संकेत स्थळावर लॉगिन करावे व आपली अचूक माहिती सादर करावी.प्रत्येक आस्थापनाने आपपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अदयावत करावा.


तिमाही विवरणपत्र मुदतीत सादर करावे व कायदयाचे अनुपालन करावे असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे कार्यालयाच्या सहायक आयुक्त कविता ह जावळे यांनी स्पष्ट केले आहे.या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य  अथवा माहिती आवश्यक असल्यास thanerojgar@gmail.com ई- मेल आयडीवर उदयोजक नोंदणी क्रमांके व इतर सर्व आवश्यक तपशीला सह संपर्क साधल्यास कार्यालयाकडून सहकार्य करण्यात येणार आहे.