शिवसेनेच्या वतीने ५००० हजार कुटुंबांना मोलाची मदत
शिवसेनेच्या वतीने ५००० हजार कुटुंबांना मोलाची मदत

ठाणे

 



नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  ठाणे महापालिका शिक्षण समिती सभापती,स्थानिक नगरसेवक  विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले यांनी  ठाणे महापालिका प्रभाग क्र-१९ मधील तब्बल ५००० हजार कुटुंबाना आतापर्यत २० टन तांदूळ,८ टन तूरडाळ,५ हजार लिटर तेल, त्याच प्रमाणे ,साखर,कडधान्य,गहू पीठ,कांदे बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला असून लॉकडाऊन संपेपर्यंत हि सेवा अविरत सुरु राहणार आहे.

शिवसेना प्रभाग क्र -१९ यांच्या वतीने प्रभागातील गरीब व गरजुंना लाख मोलाचा आधार देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. तसेच विभागातील १० हजार नागरिकांना १०० रुपयात ८ दिवस पुरेल इतक्या भाज्यांचा पुरवठा देखील याआधी करण्यात आला आहे.अशा बिकट परिस्थितीत मोलाचा आधार देऊन या संकटाशी लढण्याचे बळ आणि आत्मविश्वास शिवसेनेने दिला आहे.

कोरोना संकटाचा सामना करत असताना सामान्य जनतेला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे संचारबंदीमुळे जनजीवन ठप्प असताना रोजगार बंद झाल्याने जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे अशा परिस्थिती शिवसेनेने प्रभाग क्र -१९ मधील गोरगरीब,गरजू बांधवाना केलेली हि बहुमोल मदत त्यांना संकटाचा धैर्याने मुकाबला करण्याची ऊर्जा देणारी आहे. दरम्यान लोकडाऊन जाहीर झाल्यापासून नागरिकांना केलेल्या ठोस मदतीमुळे प्रभागात सर्वच स्तरावर स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व सौ नम्रता भोसले-जाधव यांचे कौतुक होत आहे

 

 

Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image