सायकलसह दुचाकी, जड अथवा कोणतेही वाहन रस्त्यावर आढळल्यास पोलिसांकडून जप्तीची कारवाई

सायकलसह दुचाकी, जड अथवा कोणतेही वाहन रस्त्यावर आढळल्यास पोलिसांकडून जप्तीची कारवाई



ठाणे :


अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर येणारी वाहने यापुढे जप्त केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ठाणे शहरातील वाहतूकीला यापुढे मनाई आदेशाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बंदी घातली आहे.  ठाण्यातील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकानेही १ ते १४ एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. आधी लागू केलेला आदेश ३१ मार्च रोजी संपल्यानंतर पुन्हा नव्याने पोलीस आयुक्तांनी १ ते १४ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. यातून रेशनिंग दुकाने, किराणा माल, दूध, फळे, डेअरी, बेकरी, मांस आणि मासे वाहतूक तसेच यासंबंधी प्रक्रीया उद्योगाला लागणारा कच्चा माल वाहतूक, वीज निर्मिती, प्रिंट आणि इलेक्ट्रानिक प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, वैद्यकीय, बँक कर्मचारी तसेच जल, हवाई वाहतूक करणारे कर्मचारी आदींसाठी लागू राहणार नाही.


विलगीकरण सुविधेसाठी वापरल्या जाणाऱ्या आस्थापना, सुरक्षारक्षक आणि धार्मिक स्थळांची पूजा देखभाल करणाऱ्यांनाही यातून वगळले आहे. मात्र, याव्यतिरिक्त कोणीही रस्त्यावर विनाकारण आल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सायकलसह दुचाकी, जड अथवा कोणतेही वाहन रस्त्यावर आढळल्यास पोलिसांकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, ठाणे जिल्हयातील बियर शॉप, परमिट रुम, देशी आणि विदेशी अशा सर्व प्रकारची मद्य विक्री करणा या दुकानेही १ ते १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत. या काळात कोणीही दुकाने सुरु ठेवली तर त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image