बेकायदेशीरपणे नागरिकांची वाहतूक करणा या १८ जणांविरुद्ध कारवाई
ठाणे :
ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भाः इंदर या पाच विभागांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या परिसरात कोरोना साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करण-या १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या आठवडाभरामध्ये कारवाई केली आहे. नागरिकांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणा-या १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील तसेच पाचही विभागांचे पोलीस उपअधीक्षक हे अचानक भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. २२ मार्च ते २९ मार्च या आठ दिवसांमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणा या १७७ जणांविरुद्ध कलम १८८ नुसार कारवाई केली आहे. वेगळे राहण्याचे आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणा या एकाविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाहेर जाणा या १०० मजूरांना कल्याण तालुका तर ४८ मजूरांना कसारा पोलिसांनी या काळात पकडले. त्यांना पुन्हा आपल्या घरी पाठविण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळामध्ये बेकायदेशीरपणे नागरिकांची वाहतूक करणा या १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.