जांभळीनाका होलसेल किराणा माल दुकानदारांवर निर्बंध

जांभळीनाका होलसेल किराणा माल दुकानदारांवर निर्बंध


सोशल डिस्टान्स न पाळल्यामुळे  दुरध्वनीवरुन घ्यावी लागणार ऑर्डर : महापालिका आयुक्तांचा निर्णय



ठाणे


जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाल मार्केट बंद करण्याबरोबरच तेथील होलसेल किराणामाल दुकानदार सोशल ‍डिस्टन्स पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज येथील दुकानदारांना थेट विक्री करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला. तथापि, दूरध्वनीवरुन मालाची ऑर्डर घेवून त्यानुसार डिलीव्हरी करण्याचा पर्याय  त्यांना उपलब्ध करुन दिला आहे.  दरम्यान कोरोना कोव्हीडचा संसर्ग रोखण्यासाठी किराणामाल दुकानदारांनी सोशल डिस्टान्स नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करुन महापालिका आयुक्त श्री.सिंघल यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदरांची नोंदणी रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


            या निर्णयामुळे आता जांभळीनाका किराणा होलसेल मार्केट दुकानांत ग्राहकांना थेट सामान विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून दूरध्वनीवरुन अथवा ऑनलाईन पध्दतीने माल विकण्यास परवानगी असणार आहे. घाऊक विक्रेत्यांना दूरध्वनी किंवा ऑनलाईन  नोंदणी घेवूनच त्यांचा माल किरकोळ विक्रेत्याच्या दुकानात थेट पोहचवावा लागणार आहे.   घाऊक विक्रेत्यांनी कुठल्‌याही परिस्थिमध्ये फुटकळ  खरेदी ग्राहकांना विक्री करता येणार नसून  सर्व  ‍विक्री ही ऑनलाईन व दूरध्वनीवरुन ऑर्डर घेवूनच करावी लागणार आहे.


दरम्यान कोणत्याही परिस्थितीत दुकानावर गर्दी होणार नाही याची काळजी दुकानदारांनी घ्यावी असे स्पष्ट करुन एकाच वेळी 4 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सींग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांचीही असून त्यांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर आवश्यक ती कार्यवाही करुन गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच साथ प्रतिबंधक कायदा 1897 तसेच आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कायदेशीर कार्यवाही करुन दुकानांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.  


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image