विविध कंपनीचा एकूण 1,31,750/किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त

 विविध कंपनीचा एकूण 1,31,750/किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त



मा पोलीस उप आयुक्त सो, परीमंडळ 01. नवी मुंबई यांनी दिलेले सूचना आणि आदेशाप्रमाणे आणि मा सहा पोलीस आयुक्त सो वाशी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहिती वरून वाशी पो स्टे हद्दीमध्ये संजोग हॉटेल बार अँड फॅमिली रेस्टरन्ट, से 10, वाशी येथे मॅनेजर त्याचे 3 वेटर च्या मदतीने अवैध रित्या दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून तिथे छापा टाकून सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 1,31,750/किमतीचा विविध कंपनीचे विदेशी मद्यसाठा मिळून आल्याने त्यांनी COVID-19 साथीच्या प्रादुर्भाव टाळावा असे शासनाने प्रतिबंधीत केले असताना सुद्धा अधिसूचनेचे अटींचे उल्लंघन करून विनापरवाना दारू विक्री करताना मिळून आले म्हणून त्यांचेविरुद्ध वाशी पोलीस ठाणे गु र नंबर 168/2020 मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 65(इ), भादवि कलम 188, 269, 270, महा. कोविड 19 उपाय योजना 2020 कलम 21 तसेच सार्वजनिक रोग प्रतिबंधक अधि 1897 कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – 1, नवी मुंबई, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाशी विभाग, नवी मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजिव धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सोपान राखोंडे तसेच पो.हवा. 371/डांगे, पो.हवा. 596/पाटील, पो.ना.2889/अहिरे, पो.ना. 2032/सोनावळे, पो.शि. 2222/जाधव यांनी केली आहे.