भाजपा घोडबंदर तर्फे" ट्रॅफिक मुक्त ठाणे "
ठाणे
भाजपा घोडबंदर मंडळ तर्फे" ट्रॅफिक मुक्त ठाणे " अभियान मानपाडा ब्रीज खाली सह्यांची मोहीम घेऊन राबविण्यात आले.त्या प्रसंगी आमदार मा संजय केळकर साहेब, आमदार तथा ठाणे शहर भाजपा अध्यक्ष मा श्री निरंजन डावखरे साहेब, नगरसेवक मा श्री मनोहर डुंबरे साहेब व नगरसेविका मा सौ अर्चना किरण मणेरा, नगरसेविका मा सौ कमल रमेश चौधरी, नगरसेविका मा सौ कविता पाटील, परिवहन सदस्य मा श्री. विकास पाटील, मा.श्री.सुरेश कोलते साहेब, व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाण्यातील २५ लाख रहिवाशांना दररोज वाहतूककोंडीचा फटका बसतो. मात्र, याबाबत राज्य सरकार व महापालिकेची यंत्रणा ढिम्म आहे. त्यावर भाजपा ठाणेने `ट्रॅफिक तणाव-मुक्त ठाणे' लोकअभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे कोंडीतून दिलासा मिळविण्यासाठी लढा उभारला जातोय, तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून उपाययोजना खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा यांच्या नेत्तृत्वा खाली केली जात आहे. तरी यामध्ये ठाणेकरांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोंकण पदवीधर मतदारसंघ आमदार आणि भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे यांनी केले आहे.