बुधवारी महापौर निवडणूक : नगरसेवकफुटीची भाजपला धास्ती

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरीअंतर्गत असंतोष व नाराजीमुळे नगरसेवक फुटण्याची भाजपला धास्ती वाटत आहे. त्यामुळे भाजपने आपल्या नगरसेवकांना गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गुरुवारी रात्रीपासून नेण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवकांचे मोबाइल काढून घेतले असून त्यांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे. मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांना पराभवाची धूळ चारून भाजपच्या बंडखोर गीता जैन यांना शहरवासीयांनी आमदार म्हणून निवडून दिले आहे. त्यातच राज्यातील भाजपची सत्ता गेल्याने मीरा-भाईंदर भाजपमध्येही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. कारण, निम्यापेक्षा जास्त नगरसेवक हे अन्य पक्षांतून आले असून त्यातच येणारी पालिका निवडणूक चारच्या प्रभाग पद्धतीने न होता एकेरी पद्धतीने होणार असल्याने बहुतांश नगरसेवक निश्चित झाले आहेत. अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात महापालिकेत मेहतांचा एकछत्री कारभार अनेकांना अनुभवायला मिळाला आहे. नेतृत्व सांगेल व करेल ती पूर्व दिशा, असा प्रकार चालल्याने भाजपच्या काही नगरसेवकांनी उघडपणे स्थानिक नेतृत्वाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मेहतांचा दबाव झुगारून जैन यांच्यामागे ताकद लावली होती. त्यातच जैन यांना आश्वासन देऊनही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवभाजपने मेहतांसाठी शब्द फिरवल्याचाआरोपजैन समर्थकांकडून होत आहे. समित्या, स्वीकृत नगरसेवक नियुक्ती आदी सर्वांमध्ये फडणवीस भाजपने मेहतांनाच झुकते माप दिल्याने आता जैन व समर्थक विश्वासघाताच्या भावनेने दुखावले आहेत. भाजप नगरसेवकांना २२ फेब्रुवारीरोजी गोव्याला नेणार होते. पण, नगरसेवक फुटण्याच्या भीतीमुळे गुरुवारीरात्रीचजवळपास निम्या नगरसेवकांना विमानाने गोव्याला नेण्यात आले आहे. दिक्षण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. बाकीचे नगरसेवक शुक्रवारी दुपारीवरात्री, तर काही शनिवारी गोव्याला जाणार आहेत. तालुकाध्यक्षावर


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image