कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली
क.डों. म.पा. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांची भेट
डोंबिवली
कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तालयात आयोजित बैठकीत आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी तसेच आरोग्य खात्यातील संबंधित अधिकारी यांच्यासोबत सद्य परिस्थितीचा आढावा घेत खालील निर्देश दिले.
वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीच्या अनुषंघाने तातडीने वैद्यकीय सेवेसाठी आपत्कालिन गट तयार करावेत.
🔸 कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेता पालिका प्रशासनाने कोरोना बाधित रुग्णांसाठी खाटा तयार ठेवत विशेष कक्ष स्थापन करावेत.
🔸 खाजगी रुग्णालयांमध्ये सुध्दा व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करण्यात यावेत.
🔸 कोरोना विषाणुचा संसर्ग टाळावा याकरिता परदेशातून आलेल्या नागरीकांसाठी कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील हॉटेल्समध्ये सुध्दा विलगीकरणाची सोय करावी.
🔸 तसेच परदेशातून मायदेशी परतलेल्या नागरिकांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला नसला तरी खबरदारीच्या उपाय योजना म्हणून त्यांना त्यांच्या घरी अलग ठेवण्याचे आदेश असले तरी हे नागरीक घराबाहेर पडत असल्याचे काही ठिकाणी आढळून आले असल्याचे व याला आळा घालण्यासाठी पालिका आणि पोलिस प्रशासनाने दिवसातून दोन वेळा सदर व्यक्तिच्या घरी जाऊन ती व्यक्ती घरीच असल्याची नोंद घ्यावी, अशा सुचना खा.डॉ.शिंदे यांनी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना दिली. सदर बैठकीत नगरसेवक विश्वनाथ राणे, शहर अभियंता कोळी, आरोग्य विभागाचे डॉ. लवंगारे, डॉ. चंद्रकांत सावकारे, समाज विकास कल्याण अधिकारी प्रशांत गव्हाणकर व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.