ऑर्केस्ट्रा, डान्सबार बंदीचे आदेश
ठाणे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबधात्मक उपयायोजना म्हणून नागरिकांची एकाठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पब, डिस्को, डीजे, लाईव्ह ओर्केस्ट्रा बार, डान्स बार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणारे मालिकांचे, जाहिरातींचे तसेच चित्रपटांचे चित्रीकरण देखील ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन न करणाऱ्याविरुद्ध अथवा संस्थेविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६०(४५) यांच्या कलम १८८ शिक्षेस पात्र अपराध केला असे मान्य करून पुढील करवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.