ठामपाची ग्रंथालयाची निर्मिती करण्याच्या योजनेसाठी २५ लाखांची तरतूद

ठामपाची ग्रंथालयाची निर्मिती करण्याच्या योजनेसाठी २५ लाखांची तरतूद


ठाणे



ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये अनेक योजनांचा समावेश आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात पौष्टिक आहारासाठी ५ कोटी, डीबीटीअंतर्गत लाभ योजनेसाठी चार कोटी, विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ५ कोटी, डिझिटल वर्गांसाठी ७ कोटी ५० लाखांसह विविध योजनांसाठी १३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. याशिवाय इतरही योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टिंकरिंग लॅब या योजनेचा समावेश आहे. ही केंद्र सरकारची योजना असून याच धर्तीवर पालिका शाळांमधील मुलांच्या मनातील उत्सुकता, सर्जनशीलता आणि कल्पना विकसित करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन वैज्ञानिक विचारांना वाव देण्यात येणार आहे. सन २०२०-२१च्या अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व पुस्तके सहज उपलब्ध करून देण्यासाठी गट स्तरावर, गट शाळेत प्रत्येकी एका ग्रंथालयाची निर्मिती करण्याच्या योजनेसाठी २५ लाखांची तरतूद आहे. विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षणही दिले जाणार आहे.


जास्तीत जास्त मुलांनी मैदानी खेळ खेळावेत, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. ठाणे महानपालिकेच्या विद्यार्थ्यांचा एक फुटबॉल संघही तयार केला जाणार आहे. हा संघ विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकेल. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पालिकेच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बसविणे, तसेच शिष्यवृत्ती फी आणि पुस्तके, इतर साहित्य विद्यार्थ्यांना पुरविणे, शिक्षकांना मार्गदर्शन करणे, याकरिता ६० लाखांची तरतूद आहे. महापालिका शाळेतील शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षकांची गुणवत्ता पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. आता शिक्षकांची सरकारी यंत्रणेकडून गुणवत्ता चाचणी घेतली जाणार आहे. तसेच शिक्षकांना तज्ज्ञ मंडळींकडून प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी विविध योजनेअंतर्गत अंदाजपत्रकात ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image