स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी ठाणे, वाशी येथे चर्चासत्रांचे आयोजन





स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी ठाणे, वाशी येथे चर्चासत्रांचे आयोजन

 


ठाणे

 

चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर (सीआरसी) या संस्थेतर्फे स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी ठाणे, डोंबिवली आणि वाशी येथे  १४ व १५ मार्च रोजी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. समग्नतेबद्दल असलेले गैरसमज दूर करणे आणि स्वमग्न मुलांच्या विकासामध्ये पालकांची नक्की काय भूमिका असावी हे पालकांना समजावून सांगणे हा या चर्चासत्रांचा हेतू आहे. वरिष्ठ ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि रिहॅबिलिटेशन कन्सल्टंट डॉ. सुमीत शिंदे या चर्चासत्रांमध्ये मार्गदर्शक असणार आहेत.

स्वमग्न पाल्याला स्वतंत्र आयुष्य जगता यावे यासाठी काय करावे लागेल, लहान मुलांचा विकास महत्त्वाचा की शिक्षण, यशस्वी पालकत्व म्हणजे काय, थेरपिस्टची भूमिका आणि पालकाची भूमिका, स्वमग्न मूल/स्वमग्न पालक या संज्ञांचा अर्थ काय या विषयांबाबत डॉ. शिंदे पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

पालक बहुधा इंटरनेटवर स्वमग्नतेविषयी माहिती वाचतात. त्यातून माहिती मिळण्याऐवजी अनेक गैरसमज त्यांच्या मनात निर्माण होतात. अनेक जण यामुळे गोंधळून जातात. त्यामुळे स्वमग्नतेबद्दल त्यांना सुयोग्य माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून पालकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात येणार आहे, असं डॉ. सुमित शिंदे ह्यांनी सांगितलं.

वाशी येथे १४ मार्च रोजी सायं. ४ ते रात्री ८ या वेळेत वुई ग्रो, आठवा मजला, अरुणाचल भवन, सेक्टर ३०, रघुलीला मॉलजवळ, वाशी येथे, १५ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत ठाण्यामध्ये पहिला मजला, बंट्स असोसिएशन हॉल, चाइल डेव्हलपमेंट अँड ट्रीटमेंट सेंटरच्या बाजूला, हरिनिवास सर्कल, ठाणे (प.) या ठिकाणी आणि १५ मार्च रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० या वेळेत डोंबिवली येथे गणेश मंदीर संस्था हॉल, फडके रोड, डोंबिवली (पू.) येथे या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून त्यासाठी ९२२१५३३७१९, ८८९८७६७७०१ किंवा ९२२१५३३७१७ या क्रमांकांवर संपर्क साधावा




 



Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image