कोपरीत पाईपद्वारे गॅस योजना सुरू

कोपरीत पाईपद्वारे गॅस योजना सुरू



ठाणे


ठाण्याच्या कोपरी भागात पाईपद्वारे गॅस योजना सुरू झाली असून खासदार राजन विचारे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात पाईपद्वारे गॅसची नागरिक मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. या पाईप गॅस सेवेमुळं या परिसरातील दोन हजारपेक्षा जास्त कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. ठाणे पूर्वतील नातू परांजपे कॉलनी तसंच महर्षी वाल्मिकी नगर या परिसरात ही पाईपद्वारे गॅसची सेवा सुरू झाली आहे.