मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे 


मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे 
आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या  मागणीवर महसूलमंत्र्यांचे उत्तर



मुंबई
मुंबईतील विक्रोळी ते मुलुंड या जागेवर परवडणारी घरे बांधण्यात येतील असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत स्पष्ट केल्यामुळे मुंबईत परवडणारी घरे उपलब्ध होण्याचे मार्ग खुले झाले आहे. विधानसभेत आमदार आशिष शेलार यांच्या सह भाजपा आमदारांनी मुंबईतील परवडणाऱ्या घरांचा विषय उपस्थित केला होता. मुंबईतील विक्रोळी ते मुलुंड भागातील एकूण मिठागरांच्या जागेपैकी ३०० एकर जागा घरांकरिता वापरता येऊ शकते. याबाबतचा अहवाल एमआरडीसी ने सादर केला, हे खरे आहे काय ? असल्यास, याबाबत शासनाने काय पुढील कारवाई केली असा प्रश्न आमदारांनी विचारला होता. 
या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी ज्या जागा खाजगी मालकीच्या नाहीत केंद्र व राज्य सरकारच्या मालकीच्या आहेत व सीआरझेड च्या बाहेर आहेत, केंद्र सरकारने दिलेल्या अधिसूचनेनुसार या मिठागरांचा उल्लेख पाणथळ  असा होत नाही. अशा ३५५ एकर जागेवर गरिबांना परवडणारी घरे बनविण्याचा मानस सरकारचा आहे काय ? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला, त्याला उत्तर देताना सरकारचा मानस असल्याचे उत्तर महसूल मंत्री यांनी दिले.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image