महापालिकेच्या वतीने तिथीप्रमाणे 'शिवजयंती उत्सव'' मोठ्या उत्साहात साजरा

महापालिकेच्या वतीने तिथीप्रमाणे 'शिवजयंती उत्सव'' मोठ्या उत्साहात साजरा



ठाणे


 ''छत्रपती शिवाजी महाराज की जय'', ''जय भवानी जय शिवाजी''च्या जयघोषात, बँड पथकांचे सुरेल सूर, आकर्षक चित्ररथ, शिवचरित्रावर आधारीत जिवंत देखावे आणि ढोल-ताशांचा गजरात आज ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ''शिवजयंती उत्सव'' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


       पारंपारिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाची सुरुवात आज सकाळी महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या शुभहस्ते उपमहापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक नरेश मणेरा, उप आयुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयातील कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली. यावेळी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


      दरम्यान, राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, महापौर नरेश गणपत म्हस्के, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक नरेश मणेरा, एकनाथ भोईर, संतोष वडवले, माजी नगरसेवक पवन कदम, उप आयुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यानंतर पालखीमधील शिव प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आल्यानंतर भव्य मिरवणुकीस सुरूवात झाली. ढोल-ताशांचा गजर, बँड पथके, दांडपट्टा फिरवणारे साहसी तरुण, आकर्षक चित्ररथ अशी विविधरंगी मिरवणूक ठाणेकर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.


      या सर्व पक्षीय मिरवणूकीमध्ये खासदार राजन विचारे, महापौर नरेश गणपत म्हस्के, उपमहापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक व शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक नरेश मणेरा, सुधीर कोकाटे, एकनाथ भोईर, संतोष वडवले, जयेश वैती, माजी नगरसेवक पवन कदम, नगरसेविका सौ. नंदिनी विचारे, सौ. राधिका फाटक, सौ. साधना जोशी, उप आयुक्त संदीप माळवी तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


……………………………………


फोटो ओळ :1.पारंपारिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाची सुरुवात महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयाच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली. त्यावेळी उपमहापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक नरेश मणेरा, उप आयुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.



  1. राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पारंपारिक पद्धतीने पालखी पुजन करून भव्य सर्व पक्षीय मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर सौ.पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक व शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक नरेश मणेरा,एकनाथ भोईर, सुधीर कोकाटे, संतोष वडवले,जयेश वैती, माजी नगरसेवक पवन कदम, नगरसेविका सौ. नंदिनी विचारे, सौ. राधिका फाटक, सौ. साधना जोशी, उप आयुक्त संदीप माळवी आदी मान्यवर सहभागी झाले होते.