कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही : महापौर नरेश म्हस्के

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही : महापौर नरेश म्हस्के



ठाणे


कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थीती पाहता यावेळी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही, कुणालाही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा  स्वीकारणार नाही, आपल्या आरोग्यासाठी सर्वांनी काळजी घेवूया असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.


          महापौर नरेश म्हस्कें यांचा 24 मार्च रोजी वाढदिवस असून महापौर झाल्‌यानंतर प्रथमच हा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी होणार हे निश्चीत होते, त्यामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. त्यांनी आज त्याबाबतचे जाहीर आवाहन हितचिंतकांना केले आहे. मी प्रत्यक्ष कुणाला भेटणार नाही, पुष्पगुच्छ व भेटवस्तू स्वीकारणार नाही, व नागरिकांनी देखील त्या पाठवू नये, माझ्याप्रती हितचिंतकाचे असलेले स्नेहाचे धागे हे पक्के आहेत, आपल्या  शुभेच्छा सतत माझ्या पाठीमागे असून आपले नाते हे औपचारिकतेच्या पलीकडचे आहे,  त्यामुळे  केवळ दूरध्वनीवरुन शुभसंदेश द्यावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.


          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्युची हाक दिली आहे. ती आपण सर्वांनी पाळूया. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थीतीला युध्दजन्य परिस्थती असे जाहीर केले आहे. त्यामुळे या सर्वांचे गांभीर्य राखून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे महापालिका यांच्याकडून वेळोवेळी  आरोग्याबाबत ज्या सूचना नागरिकांना देण्यात येत आहे, त्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, स्वयंशिस्त पाळावी, आरोग्याची काळजी घ्यावी. 31 मार्चपर्यतचा काळ आपल्या देशासाठी परीक्षेचा काळ आहे. या संपूर्ण आठवड्यात आपण घराबाहेर गरज असेल तरच पडा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.


Popular posts
कचरावाहक घंटा गाडीमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी केडीएमसीच्या एका कंत्राटी घंटागाडी चालकाला अटक करण्यात आली आहे.
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image