आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत

आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद



ठाणे 


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण क्षेत्रातील आठवडी बाजार दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.  


कल्याण तालुक्यातील पिंपरी,गोवेली,म्हारळ, बेहेरे, राया- ओझर्ली, भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा, कोन, खारबाव, पडघा, पाच्छापुर, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, अंबाडी, अस्नोली , मुरबाड तालुक्यातील.सरळगाव,धसई,टोकावडे,म्हसा.  शहापूर तालुक्यातील आटगाव, किन्हवली, सापगाव, गोठेघर, पिवळी, मोखावणे- कसारा, शेणवे, अघई, डोळखांब या ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहतील. उपरोक्त ठिकाणांशिवाय अन्य ठिकाणी अनौपचारिक स्वरूपात भरणारे छोटया प्रमाणातील बाजार व त्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे आदेश संबधितांना दिले आहेत.  या उपरोक्त आदेशाची अवाज्ञा करणारी  व्यक्ती अथवा संस्था भारतीय दंडसंहिता   1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image