शासन आणि प्रशासन यांच्या समन्वयाची गरज - मनोज शिंदे

शासन आणि प्रशासन यांच्या समन्वयाची गरज - मनोज शिंदे



ठाणे


ठाणे:कोरोना च्या पार्श्वभूमी राज्यातील मुख्यमंत्री दिवसागणिक वेगवेगळ्या घोषणा करित असताना राजकीय व अधिकारी यांचा योग्य समन्वयाअभावी या योजना कीवा सुविधा शेवटच्या घटकांपर्यत पोहोचत नसल्याचे चित्र दिसत आहे अशी भावना ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांनी व्यक्त केली


               जगभरातील थैमान घालत असलेल्या कोरोना संसर्गावर मात मिळवण्यासाठी सर्वच प्रयत्न करीत आहेत महाराष्ट्रातील आघाडी सरकारने देखील याचा मुकाबला करण्याकरिता चागंल्या योजना,सुविधा पुरवढा करण्याचा निर्णय घेत आहे प्रत्येक दिवशी राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे हे परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांना घरी बसन्याचे आवाहन करीत आहेत तर एका बाजूला जे बाधीत होत आहेत त्यांच्याकरिता विविध तरतूदी करून त्यांना चागंला दिलासा/आधार देण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत हे करित असताना विविध उपाय योजना विविध सुविधा देखील जाहिर करित आहेत निश्चितच त्यांनी ते त्यांची जबाबदारी एका लढवय्यासारखी पेलत आहेत


पण मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या योजना/सुविधा जाहीर होत आहेत ते राबविण्यासाठी जी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे ती कुठेतरि कमी पडते असे दिसत असल्याचे चित्र आज दिसत आहे वेगवेगळ्या तक्रारी आज विविध माध्यमातून आपल्याला जाणवत आहे.ठाण्यामध्येही कोरोणा संसर्ग पाॅसीटीव्ह रूग्ण सापडले आहेत व अजूनही काही संशयित रूग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये,राज्य सरकार करित असलेल्या तरतूदी अजूनही काही ठीकाणी पोहचत नाहीयेत किंबहुणा त्यांची सविस्तर माहितीही बहुतांशी लोकांपर्यंत पोहोचली नाहीये,


वास्तविक ठाण्यात राज्य सरकारमधील दोन जबाबदार मंत्री महोदय याबाबत चांगले काम करताना दिसत असले तरि त्यांनीही ठाण्यातील अपडेट,सूचना लोकांपर्यंत पोहोचविल्या पाहिजेत,अधिकार्यांनी सुद्धा वारंवार सरकारच्या सूचनाचा अवलंब केला पाहिजे.या संसर्गाचा प्रतिकार करण्याची जबाबदारी फक्त मुख्यमंत्री यांची नसून आघाडीतील तसेच विरोधक यांनीही सध्यस्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित पणे मुकाबला केला पाहिजे म्हणून आदरणीय मुख्यमंत्री यांनी सर्वच पक्ष कार्यकर्त्यांची मदत घेउन ज्या योजना अथवा सुविधा आहेत त्या राबविण्यासाठी प्रत्येक भागातील पक्षकार्यकर्ते,विविध सामाजिक संस्था,स्थानिक पातळीवरील मंडळे यांची मदत घेतली तर थेट नागरिकांना नक्की काय मदत पाहीजे,कसल्या सुविधा पाहिजे यांची  माहिती सरकार पर्यंत पोहोचेल व खर्या अर्थाने सरकारची मदत नागरिक व बाधितांपर्यत पोहोचेल असा विश्वास शेवटी मनोज शिंदे यांनी व्यक्त केला.