दारुची दुकाने संध्याकाळी तरी उघडी ठेवा- अभिनेते ऋषी कपूर
मुंबई :
कोरोना विषांणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक यंत्रणा आपआपल्या परीने कार्यरत आहेत. त्यातच देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात जीवनाश्यक वस्तूंच्या सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अशी परिस्थिती असताना अभिनेते ऋषी कपूर यांनी किमान संध्याकाळी तरी दारूची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी ट्विटरद्वारे सरकारकडे केली आहे
राज्यात लॉकडाऊन असल्याने लोक घरात बंद आहेत ते आपाआपल्या घरी प्रचंड नैराष्यात थांबले असून,त्यांच्या अवतीभवती प्रचंड अश्चितेचे वातावरण आहे. नागरिकांना त्याच्यावर असणारा ताण कमी करायचा आहे. त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून किमान संध्याकाळी तरी दारूची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.सरकारने सायंकाळच्या वेळेला सरकारी परवाना असलेली दारुची दुकाने उघडी ठेवायला पाहिजेत. लॉकडाऊनमुळे लोक आपआपल्या घरी प्रचंड नैराष्य घेऊन थांबले आहेत. नाहीतरी काळ्याबाजारात दारुची विक्री सुरुच आहे. सरकारला उत्पादन शुल्काचा पैसा हवाच आहे. उद्विग्नतेसोबत नैराश्यही द्यायला नको.तसेही लोक पीत आहेतच,तर मग त्याला कायदेशीर करुन टाका. बघा विचार करा. मला चुकीचे समजू नका असेही ऋषी कपूर यांनी म्हटले आहे.