शहर विकास विभागाच्या दोषीअधिकाऱ्यावर कारवाईसाठी नगरसेवक कृष्णा पाटील यांचे महापौरांना पत्र

शहर विकास विभागाच्या दोषीअधिकाऱ्यावर कारवाईसाठी नगरसेवक कृष्णा पाटील यांचे महापौरांना पत्र



ठाणे
महानगरपालिकेचा शहर विकास विभागातील एका सीडीनुसार संबंधित तत्कालीन उपअभियंता गिरीश देशमुख हे चुकीचे कामकाज करताना आढळून आले आहे आणि त्याला मदत करणारा संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई  करून महापालिकेचे कागदपत्र नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याकामी फौजदारी गुन्हे दाखल करून  पुढील कारवाई तात्काळ करण्यात यावी. तसेच ज्या विकास प्रस्तावातील  नस्तीमध्ये यांनी छेडछाड केलेली आहे. त्या नस्तीचे आपल्या प्रत्यक्ष उपस्थितीत  त्या मंजुरीबाबत पुनरावलोकन करण्यात यावे. फक्त प्रमोद निंबाळकर यांना  याबाबत सोबत घेण्यात येऊ नये,  त्रयस्थ अधिकारी बोलावण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.  हा नेहमीच बदनाम राहिलेला आहे. ठाणे महापालिकेतील तत्कालीन अधिकारी अभियंते बिल्डर वास्तुविशारद यांच्याकडे कामाला लागून महापालिकेतील त्यांचे पूर्वीचे संबंध वापरून चुकीच्या कामांना आर्थिक प्रलोभनद्वारे मंजूर करून घेत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विकासकांना इन कॅमेरा ऑडियो रेकॉर्डसह त्यांचे कामकाज करण्यासाठी शहर विकास विभागात असलेल्या केबिनचा वापर करण्यात यावा. यासाठी आठवड्यातून मंगळवार, बुधवार गुरुवार दुपारी ४ ते ६ या वेळेत ठेवण्यात यावी. महापालिका निर्मिती ते २०२० पर्यंतच्या शहर विकास विभागातील सर्व विकास प्रस्ताव अंतर्गत असलेल्या सर्व नस्ती या येत्या ७ दिवसात तपासून सेक्टरनिहाय, विकास क्रमांकनिहाय, वर्षनिहाय ठेवण्यात याव्या, याबाबत सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि भूमापक यांना एकत्रित काम करण्यास लेखी आदेश काढून स.स.न.र.यांच्या देखरेखित इन कॅमेरा हे सर्व कामकाज करण्यात यावे आणि त्याचा लेखी अहवाल घ्यावा म्हणजे आपणास गहाळ झालेल्या नस्ती यांचे प्रमाण देखील कळले पाहिजे, असेही पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे.
 काही ज्येष्ठ अधिकारी यांच्या दालनात त्यांनी स्वत:कडे खासगीरित्या ठेवलेल्या काही मोठ्या विकासकाच्या नस्ती गोडाउन मध्ये ठेवण्यात यावे. यात ज्यावेळी ज्या नस्तीचे काम असेल यावेळी ती संबंधित विकास प्रस्तावाची नस्ती अधिकारी तथा अभियंता यांच्या लेखी पत्राने गोडावूनमधून मागविली जावी आणि काम झाल्यावर पुन्हा गोडाऊनमध्ये ठेवण्यात येऊन त्याची नोंद दोन्हीवेळा रजिस्टर व संबंधित अभियंत्याकडे दिनांक वार वेळ आणि सबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या नाव पदनामसह करण्यात यावी. यामुळे नस्तीस कोण कोण हात लावते आणि किती वेळा लावते याचाही संदर्भ कळेल, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.