शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावरून भारतात प्रवेश द्या

शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावरून भारतात प्रवेश द्या



मुंबई


फिलिपिन्स येथे शिक्षणासाठी गेलेल्या 58 भारतीय विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावरून भारतात प्रवेश द्या - खासदार राजन विचारे यांची शून्य प्रहर मार्गे सभागृहात मागणी.


सिंगापूरमध्ये अडकलेल्या भारतातील 58 मुले फिलिपिन्सच्या "लास पिनियस" शहरातील जोनाल्टा फाउंडेशन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.  हे सर्व विद्यार्थी फिलीपिन्सहून 17 मार्च 2020 रोजी दुपारी भारतात येण्यासाठी आले होते. परंतु मलेशियात त्यांना कळले की भारतात जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, म्हणूनच 18 मार्च 2020 रोजी सर्व मुले सिंगापूर विमानतळावर आल्यानंतर त्यांना समजले की येथूनही तो भारतात जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती सभागृहात खा. विचारे यांनी सांगितली. सभागृहात बोलताना खासदार राजन विचारे यांनी आपल्याला ही माहिती मिळताच मी 18 मार्च 2020 च्या रात्री केंद्रीय परराष्ट्रमंत्री पी.व्ही. मुरलीधर राव आणि परराष्ट्र राज्यमंत्री श्री. हरदीपसिंग पुरी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या कार्यालयाला ईमेलद्वारे माहिती दिली


त्यावेळी मला माननीय मंत्री महोदयांनी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे असे सांगण्यात आले. लवकरात लवकर येथे आणण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर जेव्हा मी मुलांना व त्यांच्या पालकांना सांगितले की तुम्ही काळजी करू नका, भारतीय दूतावास तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुम्हाला मुंबईला घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगून मी त्यांना धीर दिला आहे.


हा विषय सभागृहाच्या पटलावर आणून तातडीने दखल घ्यावी व मुलांना मदत करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली. यासंदर्भात शिवसेनेचे शिष्ठमंडळ राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांची भेट घेतली. तसेच खासदार राजन विचारे व खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.