अबोली रिक्षाचालकांना पुस्तकाच्या माध्यमातून बोलकं केलं
अबोली रिक्षाचालकांना पुस्तकाच्या माध्यमातून बोलकं केलं

 

नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या विहंग चॅरिटेबलच्या वतीने महिलांसाठी अनोख्या सोहळ्याचे आयोजन

 


 

ठाणे


 अनामिका भालेराव यांच्या रूपाने ठाण्यातून पहिली महिला रिक्षाचालक उदयास आली . त्यानंतर आजच्या तारखेला ठाण्यात जवळपास २५० पेक्षा अधिक परमिट असलेल्या  महिला रिक्षाचालकांची संख्या असून प्रत्येक महिला रिक्षाचालकाची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे. अशा ४० अबोली रिक्षाचालकांना पुस्तकाच्या माध्यमातून बोलकं केलं आहे नगरसेविका / विहंग चॅरिटेबलच्या अध्यक्षा परिषा सरनाईक यांनी.  यांच्या " अबोलीचे बोल " या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार दि.  १३ मार्च रोजी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे संपन्न झाला.

सदर पुस्तक प्रकाशन सोहळा महिला व  बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले असून  हा हृदयस्पर्शी कार्यक्रम ठेवण्यात आला असल्याने मी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. खरोखरच महिला रिक्षा चालकांवर असे पहिलेच पुस्तक आले आहे  त्यामुळे हे कौतुकास्पद आहे. परिषा सरनाईक यांनी नुसतेच राजकारण न करता त्यांनी सामाजिक करण देखील करत असून महिलांना सक्षम, सबळ करण्याचे काम करत आहेत. त्याबद्दल त्यांचे खरंच कौतुक आहे. महिलांनी अजून जोमाने काम करा जर त्यांना कोणत्याही अडचणी आल्या तर या खात्याची मंत्री म्ह्णून मी ठामपणे तुमच्या मागे उभी राहील  असे आश्वासन उपस्थित महिलांना मंत्री महिला व बालविकास श्रीमती यशोमती ठाकूर यांनी दिले. तसेच परिषा सरनाईक या नेहमीच महिलांनच्या समस्या समजून घेतात व त्या चांगल्या पद्धतीने मांडतात त्यामुळे अशा महिलांची महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्याची गरज आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.  

यावेळी  नगरसेविका / विहंग चॅरिटेबलच्या अध्यक्षा परिषा सरनाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले कि, माझा यंदा ५० वा वाढदिवस आहे. त्यामुळे या समाजाने मला खूप काही चांगला दिला त्यामुळे त्यांच्यासाठी मी ५० नवीन कामे करण्याचा अनोखा कार्यक्रम करणार असल्याचे ठरवले होते. त्यातलेच हे माझे सर्वात आवडीचे काम "अबोलीचे बोल " महिलांचा सन्मान  केला.  तसेच माझे आणि रिक्षाचे जिव्हाळ्याचे नाते आहे ते म्हणजे मी प्रेम केल एका रिक्षावाल्यावर त्यामुळे मी जवळून बघितला आहे कि रिक्षा चालवताना किती संघर्ष करावा लागतो. त्यामुळे या महिलांनचा मला सन्मान करावासा वाटलं. तसेच महिलांसाठी नवनवीन योजना येत आहेत त्या या सर्वसामान्य महिलांपर्यंत पोचवणं हे माझे काम आहे असे मला वाटते. पण एक महिला म्ह्णून माझ्या मनाला पटेल आणि आनंद मिळेल असे काहीतरी मला महिलांसाठी नेहमी करावेसे वाटते.  त्यामुळे या महिलांचा आगळा वेगळा सन्मान ककरण्याची कल्पना माझ्या मनात आली. त्या रिक्षा महिलांच्या कथा ऐकल्या त्यातून मला वाटलं कि या महिलांच्या व्यथा पुस्तकातून व्यक्त करावेसे वाटले आणि ते मी केले त्यामुळे आज मला मनापासून आंनद झाला आहे. कोरोनाचे देशात आणि राज्यात सावट असताना देखील महिलांच्या सन्मानासाठी  महिला व  बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या आल्या त्याबद्दल त्यांचे आणि  या पुस्तकाचे शब्दांकन लेखिका साधना जोशी यांनी केले तर व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड व राजेंद्र देसाई यांनी मला जी मदत केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले . तसेच या महिलांचा राज्यस्तरीय सन्मान व्हायला पाहिजे असे मला नेहमी वाटते. या पुस्तकात त्या महिलांची व्यथा मांडल्या आहेत त्यात  काहींची मुले खूप हुशार आहेत कोणाला सैन्य दलात, कलेक्टर, पोलीस तर काही मुलींना उद्योजिका व्हायचे आहे. तर काहींच्या मुलींना रिक्षाच चालवायची आहे त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करते कि, या मुलांना पुढे येण्यासाठी मदत करा. जेणेकरून समाजात या मुलांचे स्थान वाढवण्यासाठी मदत करा. 

    सदर कार्यक्रमात  महिला व  बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार प्रताप सरनाईक, आर. टी. ओ. अधिकारी नंदकिशोर नाईक,  नगरसेवक पुर्वेश सरनाईक, मनोज शिंदे , नगरसेविका नंदिनी विचारे, जयश्री फाटक, आशा डोंगरे, विमल भोईर, मीनल संखे, उषा भोईर, जयश्री डेव्हिड, अनिता गौरी,  शिल्पा वाघ, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, मीरा भाईंदर नगरसेविका नीलम ढवण, भावना भोईर, कुसुम गुप्ता, स्नेहा पांडे, परिवहन सदस्य पुजा वाघ , व्यावसायिक अमित कारिया आदी मान्यवर व मोठ्या संख्येत महिला वर्ग उपस्थित होते.  सदर कार्यक्रमात ज्या ४०महिलां रिक्षा चालकांचा सन्मान करण्यात आला त्यांना सन्मान चिन्ह व  हाताने काढलेले  त्यांचे स्वतःचे चित्र देण्यात आले. रिक्षा चालक  महिलांनी फॅशन शो, इतर महिलांनी नृत्य सादर केले. उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले.