अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोडला पदभार                                                                                                

अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोडला पदभार                                                                                                



ठाणे  : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पूर्णविराम दिला आहे. पाच वर्षे 2 महिने ठाण्यासाठी खुप केले, स्वप्नातही ठाण्याच्या विकासाची स्वप्ने पाहिली. ठाणोकरांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी हे करु शकलो. या कार्यकाळात काही कामे अपूर्ण राहिली असतील काही चुका झाल्या असतील, त्या मी मान्य करतो. परंतु आता मी माङो पद सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि जाता जात ते भावूक झाले.
 मागील काही दिवसापूर्वी आयुक्त आणि अधिका:यांमधील व्हॉट्सअॅपवर झालेला वाद चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे आयुक्त व्यथीत झाले होते. त्यामुळे आता ते जाणार अशा देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच त्यांना सहा महिने वाढीव मुदत मिळत असल्याचीही चर्चा रंगत होत्या. अखेर आयुक्तांनी स्वत:च मी हे पद सोडत असून यापुढे मन:शांतीसाठी धर्मशाळा, ऋुषीकेशला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षे 2 महिने ठाण्याच्या विकासासाठी रस्ते रुंदीकरण, विविध महत्वांकाक्षी प्रकल्प आणले, काही प्रकल्प पूर्ण झाले काही अपूर्ण राहिले आहेत. काही प्रकल्पांवरुन एकमत झाले तर काही प्रकल्पांवरुन मतभेदही झालेले आहेत. मात्र हे मतभेद वैयक्तीत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image