तुमचा आमदार किंवा लोकप्रतिनिधी या संकटाच्या काळात तुमच्या सोबत आहेत का


तुमचा आमदार किंवा लोकप्रतिनिधी या संकटाच्या काळात तुमच्या सोबत आहेत का


ठाणे



4 महिन्यांपूर्वी तुम्ही मोठ्या कौतुकाने निवडून दिलेले आमदार आज या कठीण काळात तुमच्या सोबत आहेत का..? नसतील तर का नाहीत..? यावर विचार करा. संकटाच्या या काळात जर ही माणसं गायब राहणार असतील तर यांना पुढच्या वेळी निवडून देताना विचार करा.


कालचा धरून 5 वा दिवस आहे.आव्हाड साहेब सकाळी 7 ला बाहेर पडतात. सकाळी 7 ते रात्री 1-2 पर्यंत हा माणूस मग ग्राउंड वर असतो.नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून 5 हेल्पलाईन नंबर सुरू केले आहेत.त्यावर येणाऱ्या कॉल्स ना व्यवस्थित रित्या मार्गदर्शन केले जात आहे.



कोरोना व्यतिरिक्त देखील लोकांना इतर आजार होतात. काही लोक आधीपासूनच आजारी आहेत.अश्या परिस्थितीत या लोकांची गैरसोय होतेय.त्यांच्यासाठी आव्हाड साहेबांनो त्यांच्या मतदारसंघात जवळपास 12 ठिकाणी मदत केंद्र सुरू केले आहेत.या ठिकाणी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत स्थानिक डॉक्टर्स रेग्युलर पेशंट्स ना तपासत आहेत. ही व्यवस्था करताना देखील सोशल डिस्टनसिंग चा विचार करून जागा निवडण्यात आल्या आहेत जेणेकरून कोरोना संदर्भात घेत असलेल्या काळजीची पूर्तता होईल.


दिवसभर पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांतील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते ठिकठिकाणी फिरताहेत.गरज वाटेल तिथं आवश्यक असणाऱ्या उपाययोजना नजरेसमोरच करून घेतायत. आजकाल ते गाडीत बिस्कीट जास्त ठेवतात.ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना आवर्जून गाडी थांबवून बिस्कीट देखील आठवणीने देतायत.एकुणात 24 तास हा माणूस मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी झटतोय.


म्हणून विचारलं, कुठं आहे तुमचा आमदार किंवा लोकप्रतिनिधी..?  आहेत का या संकटाच्या काळात तुमच्या सोबत ते..?


मोहसीन आ.शेख
*राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव,महाराष्ट्र*