हौशी शिक्षकमंच आविष्कार आयोजित स्वर संकल्प कार्यक्रमात महिलांचा सत्कार

हौशी शिक्षकमंच आविष्कार आयोजित स्वर संकल्प कार्यक्रमात महिलांचा सत्कार



ठाणे :


 समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार महिलादिनाचे औचित्य साधून करण्यात आला. अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या संस्थापिका साक्षी परब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महिला कलादर्शन २०२० या कार्यक्र माचे नियोजन संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब मॅडम व त्यांच्या सहायक शिक्षकांनी केले.


हौशी शिक्षकमंच आविष्कार आयोजित स्वर संकल्प हा कार्यक्रम रविवारी दुपारी १२ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. कार्यक्र माची सुरुवात संस्थापिका साक्षी यांच्या गणेश वंदनेने झाली व त्याला कत्थकविशारद ज्योती सावंत यांनी भावमय नृत्याची साथ दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संकल्प इंग्लिश स्कूलचे संस्थापक डॉ. शंकर (राज) परब व संचालिका तथा मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब यांनी ठाण्यातील काही कर्तृत्ववान महिलांना मानपत्र तसेच मानचिन्ह देऊन सन्मानित केले.


या समारंभाला महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, रूपाली रत्ने, ऋता आव्हाड,खगोल अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक दा. कृ. सोमण, संस्कृततज्ज्ञ ज्येष्ठ साहित्यिका मेघना सोमण आदी मान्यवर उपस्थित होते. कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक, वर्तमानपत्र वितरक क्षेत्रातील दहा कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केले. यामध्ये विजयलक्ष्मी गुप्ता, अनुजा घाडगे, प्रिया दरेकर, अंजुषा पाटील, पूजा कुलकर्णी, मनीषा कदम, प्रेरणा तावडे, करिष्मा खर्डीकर, वृषाली शिंदे, दीपाली साठे, समिधा पवार यांचा समावेश होता. विविध स्पर्धातील विजेत्या महिलांनाही सम्मानित केले. याशिवाय नृत्यविशारद ज्योती सावंत,



Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image