कोरोना रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी ठामपा आरोग्य विभागाच्या आवश्यक उपाययोजना



ठाणे


चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळं घबराट निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी एका आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिका क्षेत्रात कोरोना व्हायरसचा संशयित रूग्ण आढळल्यास छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात ८ खाटांचा विलगीकरण कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. या कक्षात उपचार करणा-या डॉक्टरांसाठी दीड हजार एन ९५ मास्क आणि जवळपास दीड लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे.


या आजाराबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि याबाबत घ्यायची काळजी या संदर्भातील भित्तीपत्रकं, वर्तमानपत्रातून जाहिराती आणि आवश्यक ती माहिती प्रसिध्द करावी. पालिकेनं दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावं असं आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केलं. महापालिका क्षेत्रामध्ये या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून सद्यस्थितीत उपलब्ध असलेला औषध साठा रूग्णालयं आणि आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे. याबाबत महापालिकेनं पूर्ण खबरदारी घेतली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक ती काळजी घेतल्यास आपण या आजारावर मात करू शकतो. त्यामुळं घाबरून न जाता काळजी घ्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महापौरांनी यावेळी केलं.



 

Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image