कोरोनाच्या सामन्यासाठी ठाणे महापालिका सज्ज
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक
ठाणे
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची कार्यक्षमता राबविण्याचे दृष्टीने व विशेषतः सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्याचे दृष्टीकोनातुन प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात महापालिका अधिका-यांची विशेष नेमणुक करण्यात आली असून करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात असून दिलेल्या वेळेत सदरची पथके प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात कार्यरत असणार आहेत. यामध्ये अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे यांच्या नियंत्रणाखाली उप आयुक्त संदीप माळवी यांच्या समन्वयांतर्गत विनोद इंगळे, (उप अभियंता विदयुत), महेश रावळ (उप अभियंता श.वि.वि.) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत. उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या समन्वयांतर्गत गुणवंत झांबरे (उप अभियंता यांत्रिकी), फारूख शेख (सहा. आयुक्त, मुख्या), उप आयुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या समन्वयांतर्गत दशरथ वाघमारे (समाविकास अधि.), मकरंद काळे (विधी सल्लागार) तर उप आयुक्त मनिष जोशी यांच्या समन्वयांतर्गत देवेंद्र नेर (प्र.कार्य.अभियंता) गजानन गोदापुरे (उप कनि.व.सं.) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त(1) राजेंद्र अहिवर यांच्या नियंत्रणाखाली उप आयुक्त वर्षा दिक्षीत यांच्या समन्वयांतर्गत विनोद पवार (कार्यकारी अभियंता पा.पु.), राम जाधव (उप अभियंता श.वि.वि.), मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनेष वाघिरकर यांच्या समन्वयांतर्गत सदाशिव माने (कार्यकारी अभियंता सा.बां), दिनेश तायडे (उप कर निर्धारक ),सहाय्यक संचालक श्रीकांत देशमुख) यांच्या समन्वयांतर्गत रामदास शिंदे (कार्यकारी अभियंता श.वि.वि.), राजेश कंकाळ (शिक्षण अधिकारी), तर उप आयुक्त सचिन गिरी यांच्या समन्वयांतर्गत प्रदीप मकेश्वर (मुख्य लेखापाल) , रविंद्र कासार (उप अभियंता श.वि.वि.) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे यांच्या नियंत्रणाखाली दुसऱ्या पथकात उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या समन्वयांतर्गत सुनिल पाटील (कार्यकारी अभियंता श.वि.वि.) दयानंद गुंडप (उप समाजविकास अधि.), उप आयुक्त संदीप माळवी यांच्या समन्वयांतर्गत शैलेंद्र बेंडाळे(प्रभारी श.वि.वनि.अ.), विकास ढोले (कार्यकारी अभियंता पा.पु.वि.), उप आयुक्त मनिष जोशी यांच्या समन्वयांतर्गत नितीन येसुगडे (कार्यकारी अभियंता श.वि.वि), विजय रोकडे (उप अभियंता वि. वि.) तर उप आयुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या समन्वयांतर्गत सुनिल पाटील (कार्य. अभि. श.वि.वि), विलास ढोले (कार्यकारी अभियंता सा.बां) हे अधिकारी कार्यरत असणार आहेत.
सर्व अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या दिवशी व वेळेत आपले दैनंदिन कामकाज सांभाळून ठाणे महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्याचे दृष्टीकोनातुन प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे कार्यरत असणार आहेत.