अविवेकी पर्यटकांकडून सुरूबागा ठरताहेत लक्ष्य


उहाणू/बोर्डी :


समुद्रकिनारी सुरूबागा धूप नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन करीत असून त्याअविवेकी पर्यटकांकडून लक्ष्य होत आहेत. बागांमध्ये चारचाकी वाहने उभी करणे, प्रेमीयुगुलांचे अश्लील वर्तन,आगीच्या घटनांची पुनरावृत्ती यामुळे पर्यावरणाचा हास होत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. डहाणू तालुक्याला ३३ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलाअसून किनारपट्टीच्या धूप नियंत्रणाकरिता सुरू झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे अशा गावांचे निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेत वाढ झालीआहे. अन्य गावाच्या तुलनेत चिखले समुद्रकिनारा आणि सुरूबाग लोकवस्तीपासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असल्याने या निर्मनुष्य परिसराचा फायदा अविवेकी पर्यटक घेत आहेत. सुरूबागेत थेट चारचाकी वाहने पार्क करणे, प्रेमीयुगुलांचे अश्लील वर्तन, चूल पेटवून स्वयंपाक करणे, मद्यपान करून कचरा फेकणे आदींमुळे बकाल अवस्था आली आहे. नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याकरिता पवनचक्की येथील सुरूबागेत दिवसभर पन्नासपेक्षा अधिक चारचाकी वाहने पार्क करण्यात आली होती. परगावातील पर्यटकांनी अश्लील वर्तनाने कळस केला. मद्याच्या बाटल्या,खाद्य पदार्थाचा कचरा फेकला, धूम्रपान केले. सायंकाळी सहाच्या सुमारास बागेत वणवा लागल्याची घटना घडली. मात्र खुलेआम सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांमुळे इच्छा असूनही व्यायामाला येणाऱ्या स्थानिकांना बागेत मदतकार्य करण्याची हिंमत झाली नाही. दरम्यान, भरती आणि जोराच्या वाऱ्याने आग अधिकच पसरल्यावर स्थानिक पर्यावरणप्रेमी महेश सुरती यांनी पुढाकार घेत अन्य ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली. येथे आठवड्यातून दोन वेळा आगीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. परंतु अविवेकी पर्यटकांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यात स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वन विभागाकडून वृक्षारोपण करण्यात आले असले तरी वनाखालील क्षेत्र वन विभाग, महसूल, ग्रामपंचायत यापैकी कोणाच्या अखत्यारीत येते याची स्पष्ठता नसल्याने कारवाई होत नाही.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image