परदेशी भारतीय इसमाची बॅग परत केली
10 मार्च रोजी सुमारे 22/45 वा लंडन येथे हॉटेल व्यवसाय करणारे परदेशी भारतीय नागरिक प्रवासी नथु भाई पटेल वय 77वर्षे हे गुजरात राज्य आनंद येथील नातेवाईकांना भेटून लंडनला जाण्यासाठी मुंबई येथे शताब्दी एक्सप्रेस गाडीने येत असताना ते बोरिवली येथे उतरले असता त्यांच्या लक्षात आले कीं त्यांची हँड बॅग A- 1 या डब्यात सीट वर विसरले.गाडी मुंबई सेंट्रल येथे रवाना झाल्याने त्यांनी टँक्सी करून मुंबई सेंट्रल रेलवे स्टेशन येथे आले .त्यांनी शताब्दी एक्सप्रेस चेक केली असता गाडीत बॅग मिळाली नाही .त्यांनी पोलीस ठाणेत येवून ठाणे अंमलदार पो हवा 1483 वंजारी यांना हकीकत सांगितले
त्यांनी तक्रारदार यांचे सोबत ताबडतोब पुन्हा गाडीवर चेक करण्यासाठी गेले असता हमलाकडे चौकशी केली . हमाल बबन सोमनाथ घुगे हे बॅग घेवून पोलीस ठाणेकडे येताना दिसले त्यांच्याकडे विचारपूस केली असता गाडीत बेवारस स्थितीत बॅग मिळाल्याचे सांगितले.पोलीस ठाणेत आल्यावर तक्रारदार यांनी बॅग ओळखली व त्यातील सामान व पैसे चेक केले.
परदेशी चलन 470 पौंड, 180 uk, 172 us डॉलर, रोख 10000/-, व भारतीय चलनी नोटा असे ऐकूण 100000/- रोख व विमानाची टिकेट्स व passport व 59,200/- रु मोबाईल फोन सुस्थितीत मिळाले.psi बीरह्डे , म पो शी -2644 सोनमळे यांच्या समक्ष त्यांना परत करण्यात आले.बॅग व आतील सामान मिळाल्याबद्दल त्याने पोलिसांचे कर्तव्य दक्षपणाबद्दल आभार मानले