खाजगी  डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द करावेत - महापौर नरेश म्हस्के

आदेशानंतरही खाजगी दवाखाने रूग्णालये 
बंद  ठेवणाऱ्या  डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द करावेत


महापौर नरेश म्हस्के यांचे ठाणे महापालिकेच्या प्रशासनाला आदेश



ठाणे,


ठाणे शहरातील खाजगी दवाखाने व रुग्णालये बंद असल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. खाजगी दवाखाने व रूग्णालये बंद ठेवून रुग्णांची गैरसोय करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असे आदेश प्रशासनाने देवून सुध्दा ज्या खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले नाहीत अशा खाजगी डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत 


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र बंदची घोषणा झाल्यानंतर शहरातील सर्व दवाखाने खाजगी रुग्णालय बंद ठेवण्यात आली असून त्यामुळे सामान्य रुग्णांची गैरसोय होते आहे राज्य शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे खाजगी  दवाखाने,  रुग्णालये  यांनी आपली सेवा सुरु  ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून साथीचे आजार व अन्य छोट्या आजारांसाठी रुग्णांना रुग्णसेवा नेहमीप्रमाणे सहज उपलब्ध होऊ शकते मात्र खाजगी डॉक्टर व रुग्णालयांनी या सूचना पाळलेल्या नाहीत, त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.  एकीकडे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मोठी शासकीय रुग्णालये काम करत असताना नियमित सर्दी खोकला व साथीचे आजार असणाऱ्या रुग्णांचा ताण या शासकीय रुग्णालय वर येत आहे. त्यामुळे तातडीने शहरातील छोटे दवाखाने खाजगी रुग्णालय प्रसूतिगृह या सेवा सुरू कराव्यात असे आदेश देवून सुद्धा अद्याप खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत.  आदेश देवूनही जर शहरातील खाजगी दवाखाने, रुग्णालये यांनी आपली सेवा नियमित सुरू केली नाही अशा दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरु करावी असे स्पष्ट निर्देश महापौरांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान सध्याची युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता खाजगी दवाखाने, रूग्णालये यांनी आपली सेवा तात्काळ सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने दवाखाने सुरू करावेत असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.