मास्क, हँड ग्लोज कचरा पेटीमध्ये टाकू नका

मास्क, हँड ग्लोज कचरा पेटीमध्ये टाकू नका
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांचे आवाहन



ठाणे


कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क वापरल्यानंतर कच-याच्या पेटीत न टाकता त्यासाठी वेगळी पिशवी वापरण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.


    दरम्यान घन कचरा व्यवस्थापनामध्ये काम करणा-या सफाई कर्मचा-यांनीही याची दक्षता घेवून असा हे मास्क स्वतंत्रपणे संकलित केले जातात किंवा नाही याची खातरजमा करण्याच्या सूचनाही त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत.


 कोरोना विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी बहुतांशी नागरिक मास्कचा तसेच हँड ग्लोजचा वापर करीत आहेत. परंतू वापर केल्यानंतर ते मास्क किंवा ग्लोज आपल्या घरातील कच-याच्या पेटीत न टाकता त्याची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होणार नाही असे आवाहन श्री. सिंघल यांनी ठाणेकर नागरिकांना केले आहे.


 याबाबत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये काम करणा-या आणि कच-याचे संकलन करणा-या कर्मचा-यांनीही याची खातरजमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image